डॉ.संध्याराणी पुप्पलवार यांचे बालरोग तज्ज्ञ म्हणून निवड !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 पोच्चमागली येथील रहिवासी असलेल्या एका गरीब व शेतकरी कुटुंबातील व लातूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे मुख्य लिपिक या पदावर कार्यरत असलेल्या शंकर सायन्ना पुप्पलवार यांची द्वितीय कन्या डॉ.संध्याराणी शंकर पुप्पलवार यांनी वैद्यकीय पदवी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.पुढील शिक्षणासाठी त्यांचे बालरोग तज्ञ या पदवीसाठी नाशिक येथील महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था येथे निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ.सध्याराणी पुप्पलवार ह्या पुप्पलवार कुटुंबातील पहिल्या डॉक्टर आहेत हे विशेष आहे. डॉ संध्याराणी पुप्पलवार यांचे पहिले ते सातवी पर्यंतचे शिक्षण बिलोली येथील पुज्य साने गुरुजी प्राथमिक शाळेत झाले.तर आठवी ते दहावी नांदेड येथील महात्मा फुले हायस्कूल येथे झाले आहे. तर बारावी पर्यंतचे शिक्षण कुसुमताई चव्हाण माध्यमिक विद्यालयात पुर्ण झाले. वैद्यकीय पदवीचे शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई जिल्हा बिड येथून वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या ह्या यशाबद्दल नायगाव येथील एसबीआय बॅंकेचे ऑफिसर बालाजी उप्पोड, डॉ.नागेश लखमावाड,संजय पाटील इज्जपवार, सुभाष पेरके, माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव कुडमूलवार, विठ्ठल पुप्पलवार, माजी नगरसेवक सायरेड्डी पुप्पलवार, सायरेड्डी ठक्कूरवार, सहशिक्षक गणेश गोपुवार, मोकमोड सर, मुख्याध्यापक विठ्ठल चंदनकर,विजय होपळे सर,शंकर जाधव मुख्याध्यापक गंगय्या ठक्कूरवार, सहशिक्षक सुरेश दुगमोड, सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन हणमंलू गोनेलवार, नगरसेवक प्रतिनिधी संजय गोनेलवार, राजेश गुडलावार, पत्रकार नागोराव लोलापोड, लक्ष्मण मदिकुंटावार,पत्रकार वसंत मदिकुंटावार, पेंटाजी ठक्कूरवार,श्रीनिवास मदिकुंटावार, राजेश कळसाईत आदींनी अभिनंदन केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या