सांगवी येथील ८ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता रद्द : शिक्षण उपसंचालकाचा निर्णय

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील सांगवी येथील कै. नारायणराव पाटील कदम माध्यमिक विद्यालयातील ८ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता बोगस असल्याने ती रद्द करण्याची कारवाई लातूरच्या शिक्षण उपसंचालकांनी केली आहे. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष भगवान पवार यांनी तक्रार करुन तत्काळ प्रभावाने कारवाई करावी अशी मागणी केली होती. 
    आनंदीबाई शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा संचलित कै. नारायणराव पाटील माध्यमिक विद्यालय नायगाव तालुक्यातील सांगवी येथे असून. या संस्थेत मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्यात ८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता व शालार्थ आय डी वरुन वाद असून. संस्थेचे अध्यक्ष भगवान पवार यांनी परिशिष्ट -१ वर नसणाऱ्या व्यक्तींनी नेमणुका दिल्या आहेत अध्यक्षांच्या सहीने नाही.

त्यामुळे अनधिकृत कार्यकारिणीवर गुन्हे दाखल करावेत असा दावा दाखल केल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नायगाव यांच्या आदेशाने बोगस मान्यता घेणाऱ्यावर ४२० चा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतेवेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची जाहिरातीसाठी परवानगी घेतलेली नाही. कर्मचारी नियुक्ती करण्यासाठी योग्य त्या वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली नाही.
त्यामुळे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचांऱ्यांच्या बोगस वैयक्तिक मान्यता पुर्वप्रभावाने रद्द कराव्यात व त्यांना दिलेला शालार्थ आय डी तत्काळ रद्द करुन वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक नांदेड यांनी स्थगित केलेले वेतन शासन खाती जमा करावी अशी मागणी केली होती. 
    सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूची मते ऐकूण घेतल्यानंतर शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड यांनी (ता. २७) एप्रिल रोजी शाळेतील ८ कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता रद्द करण्याची शिफारस केली होती. शिक्षण उपसंचालक लातूर डॉ. गणपत मोरे यांनी अभिलेख पाहून माध्यमिक शिक्षणाधिकारी नांदेड यांचा निर्णय कायम ठेवत ८ कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता रद करण्यात येत आहेत असा निर्णय (ता. १२ ) जुलै रोजी दिला.
      लातूरच्या शिक्षण उपसंचालकांच्या निर्णयानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने (ता.२७) जुलै रोजी मुख्याध्यापकाच्या नावे एक पत्र देवून सुनावणीच्या निर्णयानुसार दिलेला निर्णय संबधीत कर्मचाऱ्यास कळवण्यात यावे असे सुचित केले आहे. संस्थेचे अध्यक्ष भगवान पवार यांच्या प्रदीर्घ लढ्याला यश आले असून या निर्णयामुळे बोगसगिरी करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या