संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या अध्यक्षपदी बालाजी मामा क्षिरसागर तर उप अध्याक्षपदी विनायक दाढेल यांची निवड.

[ विशेष प्रतिनिधी / रियाज पठान ]
लोहा तालुका खाजगी चालक मालक संघटनेची आज खेळीमेळीच्या वातावरणात व अटीतटीत निवडणूक होऊन त्यात बालाजी मामा क्षिरसागर हे बहुमताने विजयी झाले.खाजगी चालक मालक संघटनेच्या दर वर्षी प्रमाणे एका वर्ष्या साठी निवडणूक घेण्यात आली.
या संघटनेचे एकुण सदस्य संख्या २२७ असून अध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते त्यात १४२ मतें घेऊन विजयी झाले तर प्रतिस्पर्धी उमेदवार किशन शेटे, यांना ७८ व विकास राठोड, यांना ७ मतें मिळाली असून बहुमताने बालाजी क्षिरसागर हे विजयी झाले.निवडनुक अधिकारी म्हणून संघटनेचे माधव पवार हळदवकर हे होते.तर बिनविरोध उप अध्याक्ष म्हणुन विनायक दाढेल, व पिरसाब शेख, सचिव बाळु माणे, सहसचिव कपिल शेटे,संघटक श्याम पोले, कार्याध्यक्ष विश्वनाथ जोशी, संपर्क प्रमुख अंगद लुगारे, सल्लागार गणेश पवार, आणि शहर प्रमुख चक्रधर पवार, सदस्य शेख मैला, बालाजी नागरगोजे सह संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

*वाचत रहा मास महाराष्ट्र न्युज* www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या