प्रा.डॉ. संजय भालेराव यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता.

( नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी )
येथील शरदचंद्र महाविद्यालयातील हिन्दी विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय गणपती भालेराव यांना नुकतेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडच्या मानव्य विद्याशाखेतर्फे हिंदी विषयाचे संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे.डॉ. संजय भालेराव हे गेल्या 13 वर्षापासून हिन्दी विषयाचे अध्यापनाचे कार्य करतात.
त्यांनी अनेक संशोधनपर पेपर्सचे वाचन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रामध्ये केले असून अनेक नामांकित संशोधन जर्नलमध्ये त्यांचे संशोधक लेख प्रकाशित झाले आहेत.
एकंदरीत त्यांचा विषयातील अनुभव व ज्ञान लक्षात घेऊन त्यांना विद्यापीठाने संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. वसंतरावजी चव्हाण, जेष्ठ संचालक केशवरावजी चव्हाण, सचिव प्रा. रविंद्र पा. चव्हाण, प्राचार्य डॉ.के. हरीबाबू, उपप्राचार्य डॉ. शाम पाटील आणि स्टाफमधील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यानी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

ताज्या बातम्या