नांदेड शहरात भरदिवसा संजय बियाणी या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार. उपचारादरम्यान बियाणी यांचा मृत्यू !

[ विशेष प्रतिनिधी – शिवानंद पांचाळ ]
(नांदेड- दि‌ ५ एप्रिल)  नांदेड शहरात भरदिवसा एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला.

या गोळीबारात व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. संजय बियाणी असं मृत व्यावसायिकाचं नाव आहे.

गोळीबारात बियाणी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहरातील शारदानगर येथील त्यांच्या घरासमोरच गोळीबार करण्यात आला.

सुरुवातीला प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हे गोळीबारात गंभीर जखमी झाले. दोन दुचाकीवर आलेले आरोपी त्यांच्या घराजवळ दबा धरून बसले होते. साडे अकराच्या सुमारास संजय बियाणी घरी आले. गाडीतून उतरताच त्यांच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

https://fb.watch/cdc48kN1yI/

त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत त्याचा चालक देखील जखमी झाला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून आणि आरोपीचा शोध सुरू आहे.
खंडणीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शिवाय घटनास्थळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीसांकडून तपासले जात आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या