लोहा तालुका संजय गांधी निराधार योजनेची नवीन समिती स्थापन करावी – सरपंच पिराजी धुळगंडे !

[ विशेष प्रतिनिधि / रियाज पठान ]
मागील दोन वर्षापासून लोहा तालुका संजय गांधी निराधार योजनेची समिती स्थापन केली नाही तरी लोहा तालुक्यातील निराधार महिला, विधवा महिला, दिव्यांग, परित्यक्ता महिला यांना न्याय मिळत नाही. मागील चार महिन्यापासून निराधारांना मिळणारे. दरमहा 1000 रुपये मानधन मिळत नाही तरी या दिव्यांग, निराधार, विधवा महिलांना, न्याय देण्यासाठी समिती स्थापन करून सहकार्य करावी अशी मागणी नागोराव धुळगंडे यांनी केली आहे.
तसेच लॉकडाऊन च्या नावाखाली दोन वर्षे होत आहेत तरी निराधार योजना समिती स्थापन झाली नाही. मा.आमदार साहेबांनी नवीन समिती स्थापन करून निराधार, विधवा, दिव्यांग यांची होणारी हेळसांड थांबवावी, निराधार योजनेचे फॉर्म भरून घेणारी मोठे एजंट तहसील परिसरात फिरत आहेत. काम करून द्यायची जबाबदारी माझी असे सांगत आहेत तरी माननीय आमदार साहेबांनी याची दखल घेऊन गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय थांबवावा. नविन समिती स्थापन करून लोहा तालुक्यातील जनतेला सहकार्य करावे असे पोलीसवाडीचे लोकनियुक्त सरपंच पिराजी नागोराव धुळगंडे यांनी कळवले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या