का.संजय माने यांच्या कुटुंबीयांना १९९९च्या वर्गमात्रांकडुन८४ हजाराची अर्थिक योगदान!

धर्माबाद प्रतिनिधी –

हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबाद येथील१९९९च्या वर्ग मित्रांकडून का.संजय माने यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ८४ हजार रुपयांचा फिक्स डिपाँजीट करण्यात आला.

सविस्तर व्रत असे की, संजय माधवराव माने हे इंदिरा नगर धर्माबाद येथील रहिवासी असुन बाळापुर शिवारातील नामांकित असलेली पायोनिअर कंम्पनित बाँटलींग कामगार म्हणून कामावर होते .पण कोरोना महामारिने वडिलांचा म्रुत्यु झाल्याचा संजयच्या मनावर मानसिक तनाव वाढल्याने दि. २२सप्टेंबर२०२०रोजी ह्रदय विकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले, त्याच्या पश्चात मुलगी अराध्या ९, मुलगा आदेश ७ वर्षे ,पत्नी जयश्री ,१ भाऊ ,२बहिणी असा परिवार आहे.

हि दुख्ःत बातमी हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबाच्या १९९९च्या वर्ग मित्रांना कळाली
सदरील घटनेने दुःखी झालेल्या परिवारातील मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून त्यानी अराध्या संजय माने या मुलीच्या नावाने भारतीय डाक कार्यालय शाखा धर्माबाद येथे ८४ हजार रुपयाचा फिक्स डिपाँजीट करून कालवश संजय माने यांच्या पत्नीकडे सुपुर्द केले व भावपुर्ण आदरांजली वाहुन झालेल्या दुखातुन माने कुटुंबीयांना सावरण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सर्व वर्ग मित्रमंडळीने उपस्थित राहून कुटुंबीयांचे सात्वन केले.

ताज्या बातम्या