सांकेत चंदनकर यांचे निट परीक्षेत यश !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
              येथून 3 किमी अंतरावर असलेल्या मौजे हज्जापुर येथील रहिवाशी सांकेत शिवराज चंदनकर यांने खडतर अशा निट परीक्षेत 720 पैकी 590 गुण घेऊन घवघवीत यश संपादन करत वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरला आहे.

                 बिलोली तालुक्यातील हज्जापुर येथील माजी सरपंच कै शिवराज चंदनकर यांचे सुपुत्र सांकेत चंदनकर हे वैद्यकिय शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या खडतर अशा निट परीक्षेत यश संपादन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी आदर्श ठरला आहे. सांकेतचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आंतर भारती शिक्षण संस्थेतून पूर्ण झाले असून इयत्ता दहावीच्या मध्ये केंद्रातून सर्वप्रथम आला तर बारावीचे शिक्षण नांदेड येथील शिवशंकर महाविद्यालय कौठा येथून पूर्ण केले.

                विशेष म्हणजे दहावी नंतर निट परीक्षेसाठी खाजगी शिकवणी वर्गाकडून परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पात्र होऊन निट परीक्षेचे दोन वर्ष मोफत शिक्षण घेतले आहे. सदरील परीक्षेत 720 गुणा पैकी 590 गुण घेऊन वैद्यकिय शिक्षणासाठी पात्र ठरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे.
त्याच्या या यशाबद्दल माजी सरपंच शिवप्रकाश पाटील चंदनकर,बाबाराव पाटील साखरे, संतोष पाटील चिंचाळकर, लालेश्र्वर पाटील बिंदगे, दत्तात्रय पाटील साखरे,सुधीर पाटील चंदनकर, कुंडलवाडी मार्केट कमिटी संचालक संतोष पाटील चंदनकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे, विजय विर, दिपक चंदनकर, शिवराज चंदनकर, साईनाथ चंदनकर, आदीसह नातेवाईक, मित्र परिवार आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे.
www.massmaharashtra.com