सोसायटी चेअरमन पदी संतोष पाटील चंदनकर यांची बिनविरोध निवड !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
          येथून 3 की मी अंतरावर असलेल्या मौजे हज्जापूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक हि दिनांक 22 रोजी बिनविरोध झाली असून चेअरमन पदी संतोष पाटील चंदनकर तर व्हाईस चेअरमन पदी सायबु घारके यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती सोसायटीचे सचिव चंद्रकांत श्रीरामवार यांनी दिली आहे.
          बिलोली तालुक्यातील मौजे हज्जापूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक हि बिनविरोध झाली आहे.या निवडणुकीत चेअरमन पदी संतोष पाटील चंदनकर, व्हाईस चेअरमन पदी सायबु घारके, यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर, संचालक पदी चंदनकर मारोती, सुधीर चंदनकर, देवारे पोषटी, होनपारखे चांदराव, शंकर चंदनकर, शिळेकर किशन बाबा, चंदनकर गोदावरी, चंदनकर निर्मलाबाई, चंदनकर शिवाजी, होनपारखे माधवराव आदिची निवड करण्यात आली आहे.
यावेळी प्राधिकृत अधिकारी वाय टी घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव श्रीरामवार चंद्रकांत यांनी काम पाहिले आहे.
          या निवडीबद्दल सरपंच सागरबाई चंदनकर, उपसरपंच शंकर होनपारखे, प्रकाश पाटील चंदनकर, दुर्गादास चंदनकर, इरवंत चंदनकर, शिवराज चंदनकर, भीमराव चंदनकर, नवनाथ देवारे, नागोराव होनपारखे, शंकर शिळेकर, नागनाथ घारके, चांदराव गायकवाड, लिंगुराम मोगरे, राजेश होनपारखे, अमरनाथ कांबळे, विजय वीर, चंद्रगुप्त कुंडलवाडीकर, अनिल कोटलावार, प्रसाद होनपारखे, गंगाधर होनपारखे आदींनी शुभेच्या दिल्या आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या