कुंडलवाडी बाजार समिती निवडणुकीत संतोष पाटील चंदनकर विजयी !

■ हज्जापूर गावातून बाजार समितीवर निवडून जाण्याच्या मिळाला पहिला बहूमान ■

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
              येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक नुकतीच पार पडली असून यामध्ये 117 मते घेऊन संतोष चंदनकर हे बहुमताने विजयी झाले आहेत त्यांच्या विजया बद्दल त्यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
              कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली आहे.या निवडणुकीत काँग्रेस प्रणित संगमेश्वर शेतकरी विकास पॅनल कडून हज्जापूर येथील रहिवाशी संतोष पाटील चंदनकर हे सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघ सर्वसाधारण गटातून उभे होते,या निवडणुकीत त्यांनी 117 मते घेऊन विरोधकांचा पराभव करत बहुमताने विजयी झाले.त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकीर्दचा आढावा घेतला तर इ.स 2010 – 2015 या काळात हज्जापूर येथील जनतेने त्यांच्या मातोश्रीना बिनविरोध सरपंच पदी निवड केली होती.
तद्नंतर त्यांनी घरच्या कौटूंबिक कारणामुळे राजकीय क्षेत्रापासून अंतर ठेवून शेती व शैक्षणिक क्षेत्राशी जोडून घेतले पण गावच्या जनतेच्या आग्रहामुळे ते परत इ स 2023 मध्ये हज्जापूरच्या विविध सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड होऊन राजकीय क्षेत्रात पदार्पण केले.त्यानंतर कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागल्यावर गावातील प्रतिष्ठित नागरिक व सोसायटीच्या संचालकांनी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी केली होती, या मागणीला खतगावकारांनी होकार देत संतोष चंदनकर यांना उमेदवारी देऊन त्यांना बहुमताने विजयी केले.या विजयामुळे हज्जापूर गावातून बाजार समितीवर निवडून जाण्याचा पहिला बहुमान चंदनकर यांना मिळाला.या बहुमानाबद्दल संतोष चंदनकर यांनी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले आहेत.
तसेच या विजयात ज्याचे मोलाचे सहकार्य लाभले ते सर्वंदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर, पिंपळगाव येथील गंगाधरराव भिंगे,सुधाकर कंने,बाबाराव साखरे,अशोक साखरे,बाबाराव खेडे,मारोतीराव दगडे,शंकरराव साखरे,हज्जापूर येथील माजी सरपंच शिवप्रकाश चंदनकर, सोसायटीचे माजी चेअरमन दुर्गादास चंदनकर,ग्रामपंचायत सदस्य सुधीर चंदनकर,उपसरपंच शंकर होनपारखे,सोसायटीचे संचालक मारोती माली पाटील चंदनकर, शंकरराव शिळेकर, देवारे पोशेट्टी, ग्रामपंचायत सदस्य देवारे नवनाथ, शिवराज चंदनकर, शेषराव चंदनकर, मंगेश चंदनकर, चांदराव होनपारखे, किशन शिळेकर,आदींसह सोसायटीच्या सर्व मतदारांचे आभार मानले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या