लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचा संतोष साखरे यांची यिन जलसंपदा व पालकमंत्री नांदेड पदी निवड !

[ गोविंद बिरकुरे ] राज्यभरात यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) माध्यमातून होणारे काम, त्यातील सातत्य पाहून आम्हालाही तरूणाईकडून उर्जा मिळत असते. आता जलसंधारण, पाणी, शेती, शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा विविध समाजोपयोगी विषयांची सोडवणुक होण्यासाठी ‘यिन’च्या माध्यमातून काम व्हावे, अशी अपेक्षा माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी सोमवारी (ता. ३१) केले.
येथील यशवंत महाविद्यालयातील सभागृहात ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘यिन’च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. त्यावेळी अध्यक्षीय समारोपात श्री. सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे व ‘सकाळ’चे वरिष्ठ बातमीदार अभय कुळकजाईकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘यिन’ च्या नेतृत्व विकास गुण उपक्रमांतर्गत विविध महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या. त्यात सहभागी विद्यार्थ्यांची जिल्हा व राज्यस्तरावर निवड झाली. त्यांचे शॅडो मंत्रिमंडळ बनविण्यात आले. यात राज्यस्तरावर नांदेड जिल्ह्यातून संतोष साखरे यांची नियुक्ती झाली व त्यांना जलसंपदा व पालकमंत्री नांदेड हे मंत्रीपद मिळाले. यासाठी सत्कार समारंभ घेण्यात आला होता. श्री. सावंत म्हणाले की, ज्येष्ठ नेते (कै.) डॉ. शंकरराव चव्हाण यांनी राज्याचे जलसंपदा खाते तब्बल दहा वर्षे उत्कृष्टरित्या सांभाळले. त्यानंतर ते दोनदा मुख्यमंत्री तसेच केंद्रात गृहमंत्री झाले. आता नद्या जोड प्रकल्प विषय आला असला तरी त्या काळात १९७५ मध्ये शंकरराव चव्हाण यांनी पाण्याचा ज्वलंत विषय मांडून नदीजोड सारखा महत्वाचे विषय मांडले होते. त्यांच्या काळात राज्यातील मोठे धरणांचे महत्वाचे काम झाले त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली . 
‘यिन’च्या विद्यार्थ्यांनी चौकटीबाहेर जाऊन विचार करावा व त्याचा फायदा समाजाला कसा होईल, यासाठी प्रयत्न करावा. आपल्या जिल्ह्याला मिळालेल्या खात्यामध्ये जलपुर्ऩभरण संदर्भातील कामे करावीत. त्यासाठी प्रशासनातर्फे सहकार्य करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
‘यिन’चे अधिकारी पवन वडजे यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी ‘यिन’च्या पदाधिकारी व सदस्यांना शपथ देण्यात आली तसेच पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री संतोष साखरे यांची निवड झाली.
या निवडीबद्दल धर्माबाद शिक्षण संस्थेचे सचिव डॉ कमलकिशोर काकाणी साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. पि. सुशिला, उपप्राचार्य डॉ श्रीराम गव्हाणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा संभाजी मनुरकर व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या