उच्चशिक्षित, निष्कलंक, समाजाच्या प्रश्नांची जाण असणा-या व्यक्तींला आमदार बनवल पाहिजे – अरूणकुमार सुर्यवंशी

(नांदेड- देगलुर,०९ जुन २०२१)
देगलुर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात अनेकांनी मोर्चेबांधणी सुरूवात केली आहे. देगलुर काॅलेज देगलुर येथील रसायनशास्त्राचे प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे यांनीसुद्धा या निवडणूकीत मतांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून “सुसंवाद तरूणांशी” या बैठकीचे नियोजन लिंबोनी निवास येथे करण्यात आले होते. या बैठकीत प्रजासेना सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अरूणकुमार सुर्यवंशी उपस्थित होते.
समाजातील उच्चशिक्षित व निष्कलंक लोकांना सभागृहात जाण्याची संधी मिळाली पाहिजे व जनतेन प्रामाणिक व्यक्तीला नेता घडवलं पाहिजे अस वक्तव्य यावेळी अरूणकुमार सुर्यवंशी यांनी केल.

प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनी सुद्धा उपस्थितीतांना मार्गदर्शन करताना मतदारसंघातील अनेक समस्यांचा पाढा वाचला.
ही बैठक यशस्वी करण्यासाठी विशाल बोरगांवकर, विकास नरबागे, अनिल हसनाळकर व प्रा.उत्तमकुमार कांबळे मित्रपरिवारातील कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या