सरस्वती मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल अँड सोनोग्राफि सेंटर बिलोली चे उद्घाटन ।

[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]
बिलोली तालुक्यातील माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड यांचे नातु तथा जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड याचे चिरंजीव रोहीत ठक्करवाड यांच्या प्रयत्नामुळे बिलोलीत सरस्वती मल्टीस्पेलिस्ट हास्पीटल अँड सोनोग्राफि सेंटर उभारण्यात आलेल्या सरस्वती मल्टिस्पेशालटी हास्पीटल चे उदघाटन दि.०९ डिसेंबर २०२१ रोजी शहरातील डाँक्टराचे सत्कार करुन त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी सरस्वती मल्टिसशालिटी सोनोग्राफी सेंटर च्या उद्घाटनास उपस्थित डाॅ.भिमराव अंकुशकर, डाॅ.सातमवाड, डाॅ.बेटमोगरेकर, डाॅ.केंचे, यांच्यासमवेत न.प.माजी नगराध्यक्ष विजयकूमार कुंचनवार, नगर सेवक यशवंत गादगे व आदींचा शाल व पुष्प गुच्छ देऊन रोहीत लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी आपल्या हस्ते सत्कार केला.
बिलोली शहरात गेल्या अनेक वर्षापासून सोनोग्राफी, त्वचारोग, हाडांंचा डाॅक्टर नसल्यामुळे येथील रुग्णांना ती सुविधा मिळत नसल्यामुळे त्या रुग्णांना नांदेड किंवा देगलूर, तेलंगाना या ठिकाणी उपचार घेण्यासाठी धावपळ करावी लागत असे. हा ञास जनतेला होत अल्याची दखल माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड, लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी घेऊन आपल्या चि.रोहीत ठक्करवाड यांना नांदेड ऐवजी बिलोलीत जनसेवेसाठी सरस्वती मल्टिस्पेशालिटी क्लिनिक व सोनोग्राफी सेंटर गांधी चौक, रोड बिलोली येथे उघडण्यासाठी मार्गदर्शन केला. त्या मुळे बिलोली तालुक्यातील रुग्णांना नांदेड, देगलूर, तेलंगाना जाण्याची गरज भासणार नाही.
या मल्टिस्पेशालिटी क्लिनिक व सोनोग्राफी सेटर मध्ये रुग्णांच्या सेवेसाठी दर शनिवार स्ञीरोग व प्रसुतीशास्ञ तज्ञ डाॅ.संपदा पल्लेवाड (ठक्करवाड), पहिला रविवार डाॅ.रोहीत ल.ठक्करवाड, दर गुरुवार रोजी फ्रक्चर व अस्थिरोग तज्ञ डाॅ.प्रदिप आबाराव संगनोड, तिसरा रविवार त्वचारोग तज्ञ डाॅ.शिल्पा पटवेकर (लखमावार), तिसरा शनिवार डायबेटाॕलाॕजिस्ट डाॕ.जयश्री आढाव बोडके, पहीली व तिसरा गुरुवार आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ डाॕ.सचिन आत्माराम प्यादेकर हे राहणार आहेत.
 सरस्वती मल्टिस्पेशालिटी क्लिनिक व सोनोग्राफी सेंटर च्या उदघाटनास माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे, भाजपाचे ता.अध्यक्ष श्रीनिवास नरवाडे, उमाकांत गोपछडे, शिवाजी शेळके, अनुदत्त रायकंठवार, यशवंत गादगे, पञकार लोलापोड, गणपत धर्मपूरे, शेख फारुख, मार्तंड जेठे, यादव लोकडे यांच्या सह तालुक्याचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून

ताज्या बातम्या