राजगड नगरच्या सरपंच पदी सावित्रीबाई तेजराव चोंडे यांची बिनविरोध निवड

नायगाव शहरातील प्रसिद्ध मिरकुटे हॉस्पिटल येथे डॉ.राजेश एम.मिरकुटे, किरण मेडिकलचे संजय बाराळे यांनी नवनिर्वाचित सरपंच व सर्व सदस्य यांचा देखील सन्मान करून भावी कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
 [ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील राजगडनगर च्या सरपंच पदी सौ. सावित्राबाई तेजेराव चोंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून निर्वाचनधिकारी म्हणून विस्तारधिकारी जि.बि.कानोडे यांनी काम पाहीले आहे.
      नायगांव तालुक्यात राजगडनगर येथील सरपंच पालनवार छायाताई यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिल्यानंतर नविन सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला . ८ ऑगस्ट २०२३ रोजी राजगडनगर ग्रामपंचायत कार्यालयात नविन सरपंच पदाची निवड करण्यात आली सरपंचपदासाठी एकमेव सावित्रीबाई चोंडे यांचा अर्ज आल्याने त्यांची राजगडनगरच्या सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी सर्व सदस्य उपस्थित होते. सदर निवड प्रक्रिया संपल्यानंतर
       माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात प्रा.रविंद्र चव्हाण यांनी नवनिर्वाचित सरपंचासह सदस्याचा सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.यावेळी तलाठी मुधळे, ग्रामसेवक व्ही. व्ही. एरपलवाड, गावातीतील प्रतिष्ठित शिवाजी चोंडे, शंकर गायकवाड, माधवराव पा.सोंळके,राहुल झगडे, गंगाधर झगडे , गंगाधर हंगरगे, योगेश शेळगावे, व्यंकट चोंडे, परमेश्वर गायकवाड, सतीश झगडे,सुधाकर झगडे,रमेश चोंडे, सुनील चोंडे,सूर्यकांत झगडे, सिद्धार्थ हनुमंते,खंडू चोंडे, आनंदा झगडे, अनिल शेळगावे, सुरज झगडे,संजय झगडे, गजानन पांचाळ,भारत पांचाळ, हनुमंत घारके,दिलीप खांदाजे, बळीराम घारके,दिगंबर सुताडे, मोहन झगडे,साहेबराव काकडे यांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या