साठे नगर येथील सांस्कृतिक सभागृहाची दुरुस्ती करण्याची मागणी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
साठे नगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सास्कृतीक सभागृहाची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे त्यांना राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे यांनी निवेदन दिले आहे.
साठे नगर मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाची गेल्या अनेक महिन्यापासून दुरावस्था झाली आहे,दरवर्षी नगरपरिषदेला शासनाकडून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत लाखो रुपये निधी येतो, त्यामुळे दलित वस्ती सुधार योजना किंवा अन्य योजनेतून या सांस्कृतिक सभागृहाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे यांनी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे त्यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनावर शेख इस्माईल उर्फ इशू राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष, दिलीप भोसले, साईनाथ गांजरे, पिराजी भोसले, गंगाधर वाघमारे, लालू भंडारे, संतोष गणपत कंपाळे, सुमनबाई कंपाळे, हणमंत वाघमारे, गंगाधर वाघमारे, गजानन कपाळे, शंकर वाघमारे, गौतम वाघमारे, बालाजी वाघमारे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या