सासवणे डी.एड कॉलेज बचाव आंदोलन !

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी आमदार श्री.महेंद्र शेठ दळवी यांच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री उदय जी सामंत यांची मंत्रालयात भेट घेतली. माननीय उपसंचालक पुणे यांनी दिनांक 3 डिसेंबर 2021 रोजी काढलेल्या पत्रानुसार सासवणे अध्यापक विद्यालय हे रद्द करून त्याची मान्यता रद्द करणेबाबत पत्र काढले होते . यामुळे या विद्यालयात शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी ज्यात युवा पिढीला घडवणारे शिक्षक आहेत ते मनाने दुखावले होते.
या अध्यापक विद्यालयाची मान्यता कायम राहावी यासाठी हे सर्वजण एकत्रित जमणार आहेत. सुरुवातीस श्री.राजू साळुंखे, श्री. जीवन तेलंगे, श्री.राजू नाईक, श्री.नरेश सावंत, श्री.संतोष पाटील , संदीप कदम, जगदीश सावरकर, श्री.निलेश जोशी, श्री.आलंकार ठाकूर, श्री.हेमंत भोईर, श्री.सुभाष पाटील आदी मंडळी एकत्र आली. त्यानी एकत्रित येऊन प्रथम माननीय आमदार श्री महेंद्र शेठ दळवी यांची भेट घेतली व त्यांच्या एकत्रित परिस्थिती समजावून सांगितली.
त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय उदयजी सामंत यांची भेट घेऊन त्यांना हा विषय सांगण्याचे ठरवले. वरील सर्व मंडळींनी आपले मागणी पत्र घेऊन सन्माननीय मंत्री महोदयांची भेट घेतली . माननीय मंत्री महोदयांनी हा विषय लगेच तातडीने घेण्याचे सुचित केले व नवीन शैक्षणिक धोरणानुसार डी.एड कॉलेज च्या जागी सर्व रायगड वासियांसाठी व गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शासकीय बी.एड कॉलेजची निर्मिती करावी ही संकल्पना मांडण्यात आली.
यास मंत्रीमहोदयांनी लगेच शेरा मारून कार्यवाही सुरू करणार असल्याचे जाहीर केले. रायगड मधील अलिबाग जवळील सासवणे अध्यापक विद्यालयाच्या ठिकाणी शासकीय बी.एड कॉलेज उभे राहून गोरगरिबांची मुले त्या ठिकाणी पुढील भविष्य घडवण्यासाठी शिक्षण घेऊ शकतील हा आशावाद निर्माण झाला. यासाठी सर्व कोकणवासीयांचा व महाराष्ट्रातील सर्व शिक्षक वृंद यांचा याला पाठिंबा आहे. माननीय मंत्री महोदयांनी घेतलेल्या निर्णयामुळे सर्व शिक्षक वर्ग आनंदित झाला. सर्व शिक्षक वृंद तर्फे व सर्व माजी विद्यार्थ्यां तर्फे हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले. डी.एड कॉलेजच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी सोबत येऊन बी.एड कॉलेजच्या लढ्यात सहभागी व्हावे .
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या