नायगाव कुंटूर जवळ असलेल्या चारवाडी परिसरात नुकतीच दि. ०९/०७/२०२१ रोज शुक्रवारी सकाळी ०८ वाजता एक घटना घडली.मनोज कुलकर्णी,अंतेश्वर पिंपळे,विठठल खनपटे,दिगांबर पिंपळे तसेच इतर कार्यकर्त्यांनी एका हरणाला वनरक्षक मीनाक्षी पवार यांच्या स्वाधीन केले.
कुंटूर येथील शेतकरी मनोज कुलकर्णी या तरुण शेतकर्याने जीवाची कोणतेही परवा न करता भटक्या कुत्राच्या तावडीत सापडलेल्या हरणाला सोडवले.
या वेळी त्याच्या परिसरातील शेतक-यांनी व मित्र बालाजी हनमंते यांनी पोलीस प्रशासनला फोन करूण पण ते वेळेवर पोहचु शकले नाहीत.
त्यामुळे वन विभागाचै अधिकारी यांना फोन करुन सांगितले असता कुंटूर येथील शेतकरी मनोज कुलकर्णी आपल्या सहकारी शेतकरी यांच्या मदतीने, मुक्या प्राण्याचा जिव वाचवणे हे आपले कर्तव्य याची जाणीव ठेवून त्या हारणाचे प्राण वाचवले.
स्वत: चारवाडी येथील शेतकरी विठल खनपट्टे, दिगंबर पिंपळे यांनी गावठी मलम पट्टी करुण, कुंटूर विभागातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हरणाला स्वाधीन केले.
या कालवधीत वन विभागाचे अधीकारी वेळेवर पोहचुन त्या हरणला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. व नर्सि येथे खंडोबा मंदिर परीसरात अरण्यात सोडण्यात आले.
या परीसरातील कुंटूर पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असुन सुद्धा तेथील कर्मचारी मदतीस आले नाहीत अशी खंत परीसरातील लोकांनी व्यक्त केली.
पण कुंटूर परिसरातील वन विभागाने माणुकी दाखवली.
त्यांना सहकार्य करत ती हरण ताब्यात घेऊन उपचार करुण, वन विभागाच्या ताब्यात देऊ असे मा शेतकरी मनोज कुलकर्णी यांनी सागीतले.
या हरणाचे प्राण वाचवल्याने मनोज कुलकर्णी यांचे परिसरात लोकांकडुन कौतुक केले जात आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy