येथील शहरात गेल्या दोन दिवसापासुन सतत मुसळधार पाऊस पडत अल्याने शहरालगत असलेल्या नांदेड वेस लगत असलेल्या भोर तलाव ओरफ्लोव होऊन वहात असलेले पाणी शहरालगत असलेल्या कुंडलवाडी – दौलापूर रोडवर असलेल्या छोट्या ओढ्याला पूर आल्याने दौलापर येथील देगावे विलास शिवाजी यांची मोटार सायकल क्र.एम.एच 26 एए 5052 ही गाडी शहरातील राम राचोटी या तरुणाने घेऊन येत असताना ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहासोबत गा़डीसह वाहून गेला.
यावेळी स्थानीक तरूणांनी तात्काळ सर्थकता दाखवत राम राचोटीला पाण्यातुन बाहेर काढुन त्याचे प्राण वाचवले. हे प्राण वाचवण्याचे काम साईनाथ निरडी,संदीप बोधनकर,निलेश पाशावार,देवना पाशावार,प्रशांत पांडे सायलू अर्जापूरे,आदीने केले आहे.
असे असले तरी गेल्या दोन दिवसापासुन सततच्या मुसळधार पाऊसाने शहर व परीसरातील लाल कुंठा येथील तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्याच्या हातीतोंडाशी आलेले सोयाबिन, कापूस,तुर,आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन बळीराजा हवालदिल झाला आहे.
नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवाजी शिरामे, गंगाराम शिरामे, पिराजी कवडेकर यांनी केले आहे.
तसेच हरनाळी,नागणी,कोटग्याळ,माचनुर,गंजगाव या गावच्या ओहळाला पूर आल्याने कुंडलवाडीचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे शहर व परीसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy