सावित्रीबाई फुले स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याला पालकांची गर्दी !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 रामतीर्थ येथील सावित्रीबाई फुले इंग्लिश मेडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला व या कार्यक्रमाचे उद्घाटन रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्याअरंभी माता सावत्रीबाई फुले,विद्येची देवता सरस्वती व संस्थेचे माजी सचिव कै.सुरेश जिगळेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करून स्नेहसंमेलन कार्यक्रमाची सुरुवात देवा श्री गणेशा या गीताने करण्यात आली.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सुहास मांडले,ग्रामसेवक हाणमंतराव नरवाडे, सरपंच प्रतिनिधी राजेंद्र तोडे, उपसरपंच जयश्री देगलुरे, लक्ष्मणराव पा देगलुरे, माजी पोलीस उपनिरीक्षक सोनकांबळे, संस्थेच्या सचिव वनिता जिगळेकर, प्राचार्य अनिल आले सह आदींची उपस्थिती होती. सपोनि जगताप म्हणाले पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल शंकरनगर नेहमीच करत आहे त्यासाठी पालकांनी सहकार्य केले पाहिजे असे मत व्यक्त केले. वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थिनी इंग्रजी-मराठी विविध देशभक्ती गीतांवर, लावणीवर, रिमिक्स गाण्यावर लक्षवेधी नृत्य सादर केले.
यात मी सावित्री बोलते , हुंडा बंदी, मोबाईल च्या अति वापरामुळे नुकसान या नाटीकेत चिमुकल्या विद्यार्थीनी भुमिका सदर केले यावेळी उपस्थित पालकांच्या डोळ्यातून अश्रू आले. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पासून ते सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची नावे एलकेजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तोंडपाठ सांगितले, कोळी गीत, पिंगाग पोरी पिंगा,पापा मेरे पापा,नृत्य या सांस्कृतिक कार्यक्रमात लक्षवेधी ठरले प्रेक्षकांनी यावेळी टाळ्यांचा कडकडाट विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 
   यावेळी भोपाळ्याचे सरपंच देविदास राठोड, माजी सरपंच सुधाकर पाचांळ, माजी सरपंच हानमंतराव पाचांळ, सुनील कांबळे, जयवंतराव कंधारे, त्र्यंबक डोंगळे,पोलिस पाटील माधव घंटेवाड, भास्कर भेदेकर,कपिल भेदेकर,संभाजी शिदेसह केरूर, बिजुर, भोपाळा, रामतीर्थ, धुप्पा, जिगळा, चिटमोगरा, कामरसपल्ली, बोरगाव, कुंचेली, आटकळी सह परीसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल शंकरनगर च्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आदींनी परिश्रम घेतले.परिसरातील पत्रकारांचा व मान्यवर मंडळींचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांची प्रस्तावना अनिल आले आध्रा यांनी केले तर सूत्रसंचालन सहशिक्षक बाबुराव गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल आले यांनी मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या