महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली !

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे ]
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रा.जि.प आदर्श शाळा खरसई येथे ज्ञानोत्सव 2022 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शाळेमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. MVSTF च्या माध्यमातून आदर्श शाळा उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते शाळेला क्रीडा साहित्य व कॉम्प्युटर चे वाटप करण्यात आले. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील नाटिका सादर करण्यात आली.
तहसीलदार श्री.समीर घारे साहेब यांनी विध्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले व विध्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन केले. पोलीस निरीक्षक श्री उद्धव सुर्वे साहेब यांनी शाळेत सुरू असलेल्या विविध उपक्रमांबद्द्ल आनंद व्यक्त केला. MVSTF जिल्हा समन्वयक श्री.रत्नशेखर गजभिये सर यांनी शाळेला मिनी लॅब व इतर मदत देण्याचे व विविध उपक्रमांची माहिती घेऊन अभिनंदन केले. गटशिक्षणाधिकारी श्री.राजेश कदम साहेब यांनी विध्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाबद्दल मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा यांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. शाळेत आनंददायी शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन श्री.सानप सर यांनी केले.
उपस्थित मान्यवर तहसीलदार श्री.समीर घारे, गटविकास अधिकारी श्री प्रभे साहेब, पोलिस निरीक्षक श्री.उद्धव सुर्वे, MVSTF जिल्हा समन्वयक श्री रत्नशेखर गजभिये, गट शिक्षणाधिकारी श्री राजेश कदम, सरपंच/शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री.निलेश मांदाडकर, MVSTF तालुका समन्वयक श्री सचिन निकम,षस्वदेस कॉर्डनेटर श्री.अमोल पाटील, मुख्याध्यापक श्री.राठोड सर, सोमजाई माता मंडळ अध्यक्ष श्री.चंद्रकांत खोत, उपसरपंच श्री.इम्रान अकलेकर व इतर मान्यवर पालक विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच जिजामाता मराठी माध्यमिक शाळा आगरवाड़ा येथे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.  या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले श्री संदीप सुतार, श्री. मस्के यांनी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी विचार मांडले तर सूत्र संचलन कु.निहन्ति नाक्ति हिने केले तर आभार प्रगति सुतार हिने व्यक्त केले.मुख्याध्यापक श्री.संदीप कांबलीकर यांनी शुभेछ्या दिल्या.
रा.जि.प शाळा बनोटी येथे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिक्षिका श्रीमती.तृप्ती सावंत आणि त्यांचे सहकारी शिक्षक उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कुल खरसई शाळेत अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक श्री मुलानी, श्री सातपुते, श्री पाटिल मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
रा.जि.प.शाळा आगरवाड़ा येथे श्री.गर्जे सर, श्रीमती भोसले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. न्यू इंग्लिश स्कुल नेवरुळ शाळेत क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली मुख्याध्यापक श्री सदलगे श्री पवार, श्री.हिरवे, श्री.जाधव शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com  

ताज्या बातम्या