आंतरभारती शिक्षण संस्थेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
         येथील आंतरभारती शिक्षण संस्था अंतर्गत असलेल्या पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालय व आंतरभारती माध्यमिक विद्यालय या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.

यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची आकर्षक वेशभूषा परिधान केले होते तर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर ठाकूर श्रावणी, निवघे वैष्णवी, श्रद्धा जाधव, अवंतिका शेकलोड, कुमारी पोवाडे आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले आहे.

         यावेळी मुख्याध्यापिका जयमाला पटणे, मुख्याध्यापक विठ्ठल चंदनकर, सहशिक्षिका शेलेजा देशपांडे, सहशिक्षक लालू परसुरे,माधव मोरे, विजय गायकवाड,बालाजी पोरडवार,पद्मावती शिळेकर, सायरेडी ठक्कुरवाड, कुरणापल्ले शंकर,सुरेश सोनकांबळे, बालाजी राजुरे, अमरनाथ कांबळे, राम बादेवार ,शेख फरा आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या