लोहा न.पा.येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी !

[ विशेष प्रतिनिधी / रियाज पठान ]
लोहा नगर परिषद कार्यालयात आद्यशिक्षिका, पहिल्या महिला मुख्याध्यापीका, स्त्री मुक्तीच्या उद्धारकर्त्या, ज्ञानज्योती, क्रांतीज्योती, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस लोहा नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कर निर्धारक माधव पवार, ज्ञानेश्वर जाधव, राजू नाकेळकर, विष्णू भिसे, नरेंद्र गायकवाड, श्रीकांत किटे आदीजण उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या