क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी !

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
 जिल्हा परिषद शाळा देवघरकोंड ता.म्हसळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने बालिका दिन वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून अतिशय प्रसन्न व आनंददायी पद्धतीने साजरा करण्यात आला.
प्रथमत: बाल सभेचे आयोजन करण्यात आले बाल सभेचे अध्यक्ष म्हणून कुमारी दिक्षा संतोष पाखड व कुमारी वैष्णवी अविनाश गीजे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दिपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण केला व कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सावित्रीबाईच्या जीवनावर अनेक मुला-मुलींनी आपले मनोगत मांडले. गुणवत्ता विकास उंचावण्यासाठी भाषिक खेळ, शब्दकोडे, इंग्रजी शब्द पाठांतर, चित्रकला, गीत गायन, नृत्य असे विविध उपक्रम घेण्यात आले सर्व मुलामुलींनी ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण केली होती.
सदर कार्यक्रमाचे आयोजन यासाठी देवघरकोंड ग्रामस्थ मंडळ व व्यवस्थापन समिती यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे उत्तम नियोजन प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर व त्यांचे सहकारी श्री.सय्यद सर, श्री.करवते सर, श्री.ठाकरे सर यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या