कुंडलवाडी ते बिलोली पर्यंत सावरकर गौरव यात्रा संपन्न

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वीर सावरकरां विषयी अपशब्द बोलल्याचा निषेध म्हणून आणि सावरकर काय होते हे सांगण्यासाठी ही गौरव यात्रा काढली :-         राम पाटील रातोळीकर, विधान परिषदेचे सदस्य.

(बिलोली ता.प्र. सुनील जेठे)
भारतीय जनता पार्टी च्या वतीने नांदेड जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रा गेल्या 1 तारखेपासून काढण्यात आल्या. गौरव यात्रे चा समारोप दिनांक ५ रोजी बिलोली येथे झाला.

कार्यक्रमात भारत माता, वीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन भाजपच्या महाराष्ट्र महिला मंडळ प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता ताई चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सदरील वीर सावरकर गौरव यात्रा कुंडलवाडी पासून बिलोली पर्यंत काढण्याचे आयोजन राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगावकर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र महिला मंडळ प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता ताई चिखलीकर, माजी आमदार सुभाषराव साबणे, डॉक्टर उचेगावकर, विठ्ठल कुडमुलवार हे उपस्थित होते.

सदरील सावरकर गौरव यात्रा समारोप कार्यक्रमात राहुल गांधी यांच्या बद्दल अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे बिलोली तालुका अध्यक्ष श्रीनिवास नरवाडे पाटील, माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत गोपछडे, जिल्हा सरचिटणीस डॉक्टर माधवराव उचेगावकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष इंद्रजीत तूडमे, अरविंद ठक्करवाड, राजेंद्र रेड्डी (तोटावाड), भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडियाचे अध्यक्ष साईनाथ शिरोळे, राजू गादगे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सावरकर गौरव यात्रा यात्रेच्या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गोपाल चौधरी यांनी केले .
#सावरकर #sawarkar

ताज्या बातम्या