सावरखेड येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
             तालुक्यातील सावरखेड येथे अखंड हरीनाम सप्ताह व भागवथ कथा आणि कलशारोहण सोहळ्याचे आयोजन सावरखेड येथे २३ मार्च पासुन सुरू झाला आसुन महाराष्ट्रातील आनेक नामांकीत कीर्तनकारांचे प्रवचन ठेवण्यात आले आहे तरी परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्याच्या वतीने करण्यात आले आहे. 
          नायगांव तालुक्यात सावरखेड येथे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी अखंड हरीनाम सप्ताह त्याचबरोबर हनुमान मंदिराचे भव्य दिव्य बाधका गाव-याच्या वतीने करण्यात आले आसुन त्याचा कलशारोहण कार्यक्रम ठेवण्यात आला आहे . वेदशास्त्रसंपन्न बाबुगुरू महाराज लालवंडीकर व गुरू गयबी नागेद्र महाराज पानभोसी यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्ताह सुरू झाला आहे . २३ मार्च ते ६ एप्रिल पर्यंत हा सप्ताह चालणार आसुन महाप्रसाद २७ रोजी ठेवण्यात आला आहे.कलशारोहण चा कार्यक्रम ५ एप्रिल रोजी ठेवण्यात आला आहे .
    परिसरातील भावीकांची धार्मिक भुख भागवण्यासाठी महाराष्ट्र नामवंत कीर्तनकारांना बोलवण्यात आले आहे . हभप त्र्यंबक स्वामी नंदवनकर, हभप भरत महाराज पासलकर, हभप व्यंकट महाराज गिते लातुर, हभप गौरीताई सांगळे पंढरपूर , हभप रामकृष्ण महाराज ठाकुरबुवा पंढरपूर, हभप योगेश बाबा ईगळे धारशिव, हभप निरंजन भाईजी देवाची आळंदी, रामनवमी निमित्त ३० मार्च रोजी हभप श्रीधर महाराज कासराळीकर यांचे कीर्तन ठेवण्यात आले आहे. अखंड हरीनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी गावकरी परिश्रम घेत आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या