के. रामलू शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ; आशिष जायेवार तालुक्यातून प्रथम !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
      फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला त्यामध्ये शाळेतील 24 विद्यार्थी पात्र तर 3 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत यामध्ये इयत्ता 5 व्या वर्गातून आशिष जायेवार हा 250 गुण घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे.
तर नागेश डोणगावे 204 व इयत्ता 8 व्या वर्गातून संकेत अष्टमवार हा 186 गुण घेऊन शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. तसेच दैनिक सकाळ या वृत्तपत्रामार्फत घेण्यात आलेल्या चित्रकला परीक्षेत अ गटातून सार्थक संजय सोलापूर द्वितीय तर ब गटातून तन्वी माडेवार ही विद्यार्थीनी उत्तेजनार्थ आली आहे. या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष सायरेड्डी ठक्कूरवार, सचिव यशवंत संगमवार, संचालिका रमा ठक्कूरवार, शाळेचे मुख्याध्यापक टी. नरसिंगराव,पर्यवेक्षक राजेश कागळे यांनी या विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या