शांतीनिकेतन माध्यमिक विद्यालय कुंटूर येथे स्वयंशासन दिन संपन्न !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
 आज दि 01/02/2023 रोजी शांतीनिकेतन मा.विद्यालय कुंटूर येथे स्वंयशासन दिन कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक म्हणुन कु.सुजाता गाडगे,पर्यवेक्षक म्हणुन सुर्यकांत देवदे,तर लीपीक म्हणुन कु.क्रांती शिंगणे आणि लो. प्रा.शाळेच्या मु.अ म्हणुन अश्विनी गायकवाड हिने काम पाहीले.

इ.10 वीचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी शिक्षक, शिक्षिका म्हणुन भुमिका पार पाडले. तर परीक्षक म्हणून श्री शिंदे सर, श्री भुसेवार सर, श्री पाटील एस.व्ही सर, सौ.नव्हारे मॅडम यांनी काम केले.
या कार्यक्रमाचे नियोजन वर्ग शिक्षक श्री वडजे सर यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पांडे सर ,श्री महादळे सर व सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले व शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर यांनी सहभागी सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनीचे व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री वडजे सर यांचे अभिनंदन केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या