जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोरणा येथे स्वयंशासन दिन उत्साहात साजरा !

बिलोली तालुक्यातील संकुल दुगाव अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोरणा येथे दिनांक १० मार्च २०२२ रोजी स्वयंशासन दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून श्रीकांत सोनकांबळे, उपमुख्याध्यापिका कुमारी ऐश्वर्या ढगे व साक्षी बोरगावे, अनुष्का नरवाडे, ऐश्वर्या हिवराळे, मल्लिका कुंमरज, प्रीती नरवाडे, सत्यजीत नरहरे, राजनंदनी नरवाडे, लोकेश नरवाडे, कृष्णा नरवाडे, ऐश्वर्या ढगे, पांडूरंग नरवाडे, तानाजी बोरगावे, गोविंद हंबर्डे या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली.

तर गोविंद गिरी व शाश्वत नरवाडे यांनी सेवकाची भूमिका पार पाडली. या सर्व मुलांना शाळेचे मुख्याध्यापक श्री गंगाधर शिंदे, स.शि.सुभानकर सर व शंकर हासगुळे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सर्व मुलांना अल्पोपहार देण्यात आला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या