के. रामलू शाळेत स्वयंशासन दिन उत्साहात साजरा !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
               शिक्षक दिनाचे औचित्य साधून के. रामलू पब्लिक स्कुल या शाळेत स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील वर्ग दहावीतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक, सेवक, अशा सर्वच भूमिकेत एक दिवस शाळेचे प्रशासन सांभाळले आहे.

 

             दुपारच्या सत्रात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी दहावीतील विद्यार्थ्यांनी ‘तुम्ही हो माता तुम्ही हो पिता’ या गीताचा तालावर आपल्याला ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकावर फुलांचा वर्षाव करीत व लेखणी भेटवस्तू देऊन शिक्षकांचा सत्कार केला. एक दिवसीय मुख्याध्यापिका म्हणून वैष्णवी कोंडावार,उपमुख्याध्यापिका अक्षिता नरावाड आदिसह 55 विद्यार्थ्यांनी वर्ग अध्यापनाचे कार्य केले. यात अध्यापनाचे 3 गट करण्यात आले होते.
उत्कृष्ट अध्यापन केल्यामुळे 1ली ते 3 री या गटातून प्रथम प्रतिभा शिंदे, द्वितीय आदित्य तुंगेनवार, तृतीय गायत्री येप्पुरवार, तर उत्तेजनार्थ म्हणून मयुरी सोळंके,राजश्री कोलंबरे,कोमल गरुडकर, वर्ग 4 थी ते 6 वी या गटातून प्रथम तन्मय ठक्कुरवार, द्वितीय श्रुती हाके, तृतीय वैष्णवी कोंडावार, प्रोत्साहन पर म्हणून मरकंटेवार वैष्णवी, प्रीती बोंबले, मयुरी सोळंके, 7वी ते 9 वी या गटातून प्रथम हासिनी म्हैसेवाड,द्वितीय अक्षता नरावाड, तृतीय सृष्टी सुरोड, तर प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून धनश्री वाघमारे, त्रिविक्रम बाभळीकर, प्रणव भोरे आणि मदर टीचर म्हणून तहुरा शेख,सेवकाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल मनोज खांडरे यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 
             या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य टी. नरसिंगराव प्रमुख पाहुणे म्हणून संचालिका रमा ठक्कुरवार, मुख्याध्यापक मठवाले, पर्यवेक्षक कागळे,यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलकर्णी उमाकांत यांनी केले तर आभार प्रदर्शन दाबलबाजे विजय यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या