वाढदिवसानिमित्त विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
 येथील शाहू महाराज प्राथमिक विद्यालय कुंडलवाडी येथे आरळी सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्या सौ सुरेखाताई सुभाष गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक विश्वनाथ अण्णा दाचावार, पत्रकार दिगंबररावजी लाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सोलापुरे गीता,जेष्ठ सहशिक्षक धोंडिबा बगाडे, कैलास जवदवार, शंकर गायकवाड, कृष्णा मोरे, बालाजी वडजे आदी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या