के. रामलू शाळेचे विविध स्पर्धेत यश !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
               के .रामलू शाळेने दि.३ रोजी क्रांतीसुर्य जननायक बिरसा मुंडा जयंती सोहळ्या निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
यात क्रांतीसुर्य जननायक बिरसा मुंडा उत्सव समिती तर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत शहरातील विविध शाळांतून एकूण 168 विद्यार्थी बसले होते त्यातून के . रामलू शाळेतील विद्यार्थिनी प्रथम श्रेया गट्टूवार ,द्वितीय शालिनी बोंबले , तर तृतीय तुळशीराम दीडशेरे आणि उत्तेजनार्थ बक्षिस श्रीजा पाठक हिने पटकावले. तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत अक्षिता नरवाड, तुळशीराम दीडशेरे ,रितिका जोशी, क्रांती लिंगमपल्ले,विनायक शेरीयाल यांच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावले आहे. 
या सोबतच शाळेतील प्रथम सत्र परीक्षेत यश मिळवलेले वर्ग १०वी तील विद्यार्थी यात प्रथम क्रमांक कोंडावर वैष्णवी नर्सिंग ९७.६६%,द्वितीय हाके श्रुती सूर्यकांत ९६.६७% , तृतीय नरावाड अक्षिता सयाराम ९६ .५% , तर सोळंके मयुरी मेहेर ९६ .१६% , म्हैसेवाड हसिनी शेखर ९६% गुण घेऊन यश संपादन केले . याबद्दल वर्ग १०वीचे वर्ग शिक्षक कुलकर्णी उमाकांत व या सर्वांचे शैक्षणिक साहीत्य देऊन सत्कार करण्यात आले .
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कुंडलवाडी अय्यप्पा सेवा समितीचे गुरु स्वामी रमणाप्रसाद, गंगाधर तोटावार, शाळेचे अध्यक्ष सायरेड्डी ठक्कूरवार, सचिव यशवंत संगमवार, संचालिका रमा ठक्कूरवार, प्राचार्य टी. नर्सिंगराव, मुख्याध्यापक मठवाले पापयाअप्पा,आदी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाले संतोष तर आभार प्रदर्शन कागळे राजेश यांनी केले .
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या