के.रामलू पब्लिक स्कुलमध्ये विज्ञान दिवस उत्साहात साजरा !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून के रामलू पब्लिक स्कूल येथे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आला होता, यामध्ये एकूण 38 प्रयोगाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले आहे.त्यामध्ये समाजातील अंधश्रद्धा नष्ट होवून वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धींगत व्हावा हा या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता.

यावेळी कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा होनशेटटे, बिलोली तालुका डाॅ.असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. हणमंत लखमपुरे, डाॅ.नरेश बोधनकर, गट साधन केंद्राच्या प्रतिनिधि सौ.अर्चना अनसापुरे, पोलीस ठाण्याचे स.पो.नि करीमखान पठाण, पालक शकील सेठ, पञकार गणेश कञुवार, संस्थेचे अध्यक्ष सायरेडडी ठक्कुरवार, संचालिका रमा ठक्कुरवार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तर 2019 या शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे पर्यवेक्षक श्री. कागळे सर, सौ.संध्या पाठक, दाक्षायणी नुग्रावार, श्वेता पटवेकर, यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन सौ.संध्या पाठक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री कागळे सर यांनी केले आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या