आंतर भारती शिक्षण संस्थेत विज्ञान प्रदर्शनाचे सादरीकरण !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे )
बिलोली येथील आंतर भारती शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या साने गुरुजी प्राथमिक विद्यालय,आंतर भारती माध्यमिक विद्यालय,विजय पटणे मेमोरियल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून दिनांक 4 मार्च रोजी विज्ञान प्रदर्शन भरवून त्याचे सादरीकरण करण्यात आले आहे.

यावेळी तिन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी जवळपास 114 प्रयोगाचे सादरीकरण केले आहे.तसेच उपस्थित विध्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार गंगाधररावजी पटणे, तहसीलदार सिद्धार्थ निळे,पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे, संस्थेचे सचिव चंद्रशेखरराव पाटील सावळीकर यांनी मौलिक मार्गदर्शन केले आहे.
यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष गंगाधरराव पटणे तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सिद्धार्थ निळे, गटशिक्षणाधिकारी तोटरे सर, पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे, संस्थेचे उपाध्यक्ष नंदाताई पटणे, संस्थेचे सचिव तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखरराव पाटील सावळीकर, संस्थेचे सहसचिव तथा मुख्याध्यापिका जयमाला पटणे, संस्थेचे संचालक कुंचलीकर, आदीसह पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक विठ्ठल चंदनकर, दत्तात्रय साखरे, लालू मदनुरे, मोहन लंगडापुरे,bविकास मिसाळे आदींसह तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आदींनी परिश्रम घेतले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शैलजा देशपांडे यांनी केले तर आभार लालू मदनुरे यांनी मानले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या