कब बुलबुल जिल्हा मेळाव्यात जनता प्राथमिक विद्यालयाचे घवघवीत यश !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नांदेड़ भारत स्काऊटस आणि गाईडस जिल्हा कार्यालय नांदेड च्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कुंटूर तांडा ता. नायगाव (खै) जि. नांदेड येथे दिनांक 03 ते 06 फेब्रुवारी 2024 पर्यंत झालेल्या कब बुलबुल व स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यातील विविध स्पर्धेमध्ये चार पारितोषिक प्राप्त करून जनता प्राथमिक विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मेळाव्यामध्ये आपला दबदबा कायम ठेवला.
संगीत खुर्ची स्पर्धमध्ये कु. गायत्री तमनबोईनवाड या विद्यार्थिनींने प्रथम क्रमांक प्राप्त केला, तर कब चा शोभायात्रे मध्ये द्वितीय क्रमांक, कब चा शेकोटी कार्यक्रमामध्ये द्वितीय क्रमांक, तसेच बुलबुल यांचा शेकोटी कार्यक्रमामधे तृतीय क्रमांक मिळविला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा नायगांव विधानसभेचे प्रथम आमदार मा. श्री वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब, संस्थेचे जेष्ठ संचालक मा. श्री केशवराव पा. चव्हाण, संस्थेचे सचिव प्रा. रविन्द्र पा चव्हाण यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक शिक्षिका यांचा सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी उपस्थित जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के. जी. सूर्यवंशी सर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर चव्हाण यांच्या हस्ते मार्गदर्शक शिक्षक श्री नागठाणे सर, सौ गट्टेवार मॅडम व सहभागी विद्यार्थी कु. पूर्वी चलमेवार, दिव्या घारके, विद्या घारके, गायत्री तमनबोईनवाड, श्रद्धा गोरडकर, सोनाक्षी नाईक, रुद्रा चलमेवार, मदन कुंभार, विराज हिवराळे, चंद्रकांत कदम, वेदांत धुपे, रुद्र उडतेवार, या सर्वांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले याप्रसंगी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर चव्हाण तसेच सौ जमादार मॅडम, श्री नारे सर, श्री नागठाणे सर,श्री बावणे सर, सौ गट्टेवार मॅडम, श्री टाकळे सर, जाधव सर, कोलमवर सर, लंगडापुरे सर, गाडले सर, लोंढे डी. जी., शेख गुलाबसाब या सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या