नायगाव तालुकास्तरीय स्काऊट गाईड नोंदणी उजळणी वर्ग उत्साहात संपन्न.

[नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील जनता प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, तालुक्यासाठी स्काऊट गाईड युनिट नोंदणी व उजळणी वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या उजळणी वर्गासाठी अध्यक्ष म्हणून जनता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गंगाधर चव्हाण यांची उपस्थिती लाभली, तर उद्घाटक म्हणून नायगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री नंदकुमार काकडे यांची उपस्थिती लाभली. उजळणी वर्गाची सुरुवात स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांचे प्रतिमापूजन व स्काऊट प्रार्थनेने करण्यात आली.यावेळी स्वावलंबी ,शिस्त,देशभक्ती शिकवणारी ही चळवळ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त आहे असे मत गटशिक्षणाधिकारी श्री नंदकुमार काकडे यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले.
तसेच स्काऊट गाईडचे प्रशिक्षण हे शिक्षकांना वैयक्तिक जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत उजळणी वर्गाचे अध्यक्ष श्री गंगाधर चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी स्काऊट गाईडच्या विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये ऑफलाइन व ऑनलाइन नोंदणी करणे, प्रशिक्षणे, समुदाय विकास कार्यक्रम, जिल्हा मेळावा, अभ्यासक्रम इत्यादी विषयावर माहिती देण्यात आली. या उजळणी वर्गास स्काऊट गाईड कार्यालयाचे मार्गदर्शक म्हणून श्री रमेश फुलारी,सहा.जिल्हा आयुक्त स्काऊट, श्री रमेश जनार्दन इरले जिल्हा संघटक स्काऊट, श्रीमती शिवकाशी तांडे जिल्हा संघटक गाईड,श्री हेमंत बेंडे स्काऊट मास्टर यांनी मार्गदर्शन केले या उजळणी वर्गाचे प्रास्ताविक जिल्हा संघटक गाईड श्रीमती शिवकाशी तांडे यांनी केले तर आभार श्री रमेश फुलारी यांनी मानले.
या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी..केंद्रप्रमुख श्री शिवराज साधू यांनी उजळणी वर्गास शुभेच्छा दिल्या.या उजळणी वर्गास तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षक /शिक्षिका, स्काऊटर/ गाईडर उपस्थित होते. यावेळी कार्यालयीन कर्मचारी श्रीमती अनुराधा कोटपेट यांनी ऑनलाईन नोंदणी बाबत ऑफलाईन नोंदणी बाबत कार्य केले. सदर उजळणी वर्गास शिक्षणाधिकारी (प्रा.) तथा जिल्हा मुख्य आयुक्त डॉ. सौ.सविता बिरगे मॅडम व शिक्षणाधिकारी (मा.) तथा जिल्हा आयुक्त स्का श्री प्रशांत दिग्रसकर सर यांनी शुभेच्छा दिल्या.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या