बि- फार्मसी काँलेज नायगाव येथील 17 विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये नौकरीसाठी निवड

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
एज्युकेशन सोसायटी नायगाव (बा.) संचलित बळवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ बी. फार्मसी नायगाव बा. येथील शैक्षणिक वर्षे 2022-23 मधील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे ‘हॅट्रो लॅब प्रा.लि. हैद्राबाद’ या कंपनीचे कॅम्पस फार्मसी कॉलेज मार्फत मुलाखतीचे आयोजन करण्यात आला होतो या मुलाखतीमध्ये फार्मसी कॉलेजी मधील विद्यार्थ्यांपैकी 40 विद्याथ्र्यांनी मुलाखत दिली.
त्यापैकी 11 विद्यार्थ्यांनी सदरील कॅम्पसमधुन कंपनीमध्ये नौकरीसाठी विनायक सुवर्णकार, सिमाताई जाधव, चाऊस अवेज, मंगरूळे गोविंदराज, टाकळकर ऋतुजा, पांचाळ दिपक, श्रीनिवास शिंदे, सौरभ चालिकवार, याबाजी शिवकुमार, सुशांत हिंगमीरे, साईमोहन रतकंटवार यांची निवड झाली तर ‘फ्लेमिंगो फार्मासिटिकल एम.आय.डी.सी.कृष्णूर’ या कंपनीचे फार्मसी मार्फत मुलाखतीचे आयोजन केले सदर मुलाखतीतुन कॉलेज मधील 10 विद्यार्थी मुलाखत दिले त्यापैकी 4 विद्यार्थी कु.चैतन्य जस्वाल, बसवदे नितीन, पांडे मिराताई, संध्या कदम यांची निवड (क्यु.ऐ.डिपार्टमेंट) मध्ये झाले आहे.
तर ‘गिब्ज हेल्थकेअर सोल्युशन औरंगाबाद’ मार्फत घेण्यात आलेल्या मुलाखती मध्ये एकुन 10 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिले त्यापैकी 2 शंकर वडजे, अतुल जाधव या विद्याथ्यांची यांची निवड मेडिकल कोडिंगसाठी झाली आहे. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील कार्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.आ. वसंतराव बळवंतराव चव्हाण, संस्थेचे सचिव प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण, कॉलेजचे डायरेक्टर श्री. क्षीरसागर विशाल वसंतराव, संपूर्ण प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्फत शुभेच्छा देण्यात आले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या