सोयाबीन विक्रीत शेतकऱ्यांची लूट थांबवा अन्यथा हजारो शेतकरी घेऊन आंदोलन करू – गौतम गावंडे

[ बिलोली – गौतम गावंडे ]
बिलोली तालुक्यातील सोयाबीन विक्री करत असताना अडत व्यापारी यांच्याकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. तालुक्यातील कासराळी, बडूर, सगरोळी, शंकर नगर, आदमपुर, कुंडलवाडी, लोहगाव, किनाळा, हिप्परगा, आटकळी आशा बरेच ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करताना शेतकऱ्यांची सर्रास लूट चालू आहे. शेतकऱ्याने सोयाबीन कितीही उन्हात वाळून बाजारात नेले असता; “मॉइश्चरच्या” नावाखाली शेतकऱ्यांची लूट चालू आहे तसेच 50 किलो च्या ऐवजी 52 किलो वजन घेताहेत व शेतकऱ्यांना ओरिजनल बिला ऐवजी एका पेपर वर बिल देत आहेत.
अगोदरच शेतकरी ओल्या दुष्काळात व ‘कोरोना महामारी’ या प्रसंगात गुरफटून जात असताना;खाजगी व्यापार्‍यांनी ही चालवलेली लूट म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. शेतकऱ्यांच्या भावना व वेदना लक्षात घेऊन जिल्हाधिकारी साहेबांनी यावर तात्काळ निर्णय घेऊन व्यापाऱ्यांचे सोयाबीन चे ओलावा तपासणी यंत्र,वजन काटे व खरेदी-विक्रीचे पक्के बिल तपासावे व त्यांच्या बिलाचे अंकेक्षण करावे; अन्यथा हजारो शेतकरी घेऊन आपल्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
असे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना मेल द्वारे व उपविभागीय साहेब बिलोली तहसीलदार साहेब बिलोली कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोली यांना लेखी स्वरुपात निवेदन रिपब्लिकन सेनेच्या बिलोली तालुक्याच्या वतीने देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष गौतम गावंडे, रिपब्लिकन सेनेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ गावंडे, तालुका सचिव शेषराव गावंडे, हरिदास भंडारे ,युवा अध्यक्ष जयदीप गावंडे, शहराध्यक्ष सतीश कुडके, व्यंकट दरकासे, अविनाश संतई, सय्यद अनवर, अक्षय सर्जे आदिंनी स्वाक्ष-या केल्या आहेत.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या