बिलोली पोलिस ठाण्याचे जमादार लक्ष्मण सोनकांबळे यांची बदली ; निरोपानिमित्त पो.नि.शिवाजी डोईफोडे यांच्या हस्ते सत्कार ।

[ बिलोली – सुनिल जेठे ]
बिलोली येथील पोलीस स्टेशन येथून पोलीस स्टेशन कुटूंर येथे पोलीस जमादार लक्ष्मण सोनकांबळे यांची बदली झाल्या निमित्त दि.१६/१२/२०२१ रोजी निरोप देत असताना पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर पोलिस ठाणे चे पो.निरिक्षक यांचे विश्वास संपादन करून शासकीय सेवा बजावत असताना पो.जमादार सोनकांबळे येथील सर्व पोलिस उपनिरिक्षक यांच्या सोबत निस्वार्थपणे, कुठल्याही अमिषाला बळी न पडता उत्कृष्ट पणे कामगिरी करत होते.
म्हणून त्यांच्या ह्या पोलिस सेवा कार्याबद्दल जान ठेवून बिलोली पोलिस ठाणेच्या वतीने पो.नि.शिवाजी डोईफोडे, सर्व सहा पोलिस उपनिक्षक यांनी आपल्या हस्ते पोलीस जमादार लक्ष्मण सोनकांबळे यांना निरोप देण्यासाठी शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला आणि पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सहा.पोलीस निरीक्षक केन्द्रे, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले, सहा.पोलीस उप निरीक्षक बोधने यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी मिञमंडळ व अंमलदार उपस्थित होते. या निरोप संमारंभा नंतर जमादार लक्ष्मण सोनकांबळे यांनी पो.नि.डोईफोडे यांचे व सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचे अभार मानले.
www.massmaharashtra.com

युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून

ताज्या बातम्या