जयराम आंबेकर विद्यालयात सांगता समारोप कार्यक्रम व वसंतिक वर्गाचे उद्घाटन सोहळा संपन्न !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
जयराम आंबेकर विद्यालय अर्जापूर येथे दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या शालेय लेखी परीक्षेच्या शेवटच्या दिवशी शैक्षणिक वर्ष 2023- 24 सांगता समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात शाळेतील वर्ग पाचवी ते नववी वर्गातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शैक्षणिक वर्षात शाळेतील विविध उपक्रम, शैक्षणिक स्पर्धा, अभ्यासक्रम, तसेच इतर शैक्षणिक बाबीवर चर्चा करण्यात आले. शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याकडून ज्या चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती होणार नाही याबद्दल विद्यार्थ्यांना सूचित करण्यात आले. मागील शैक्षणिक वर्षाचे जे काही राहून गेले ते पूर्ण करण्याची विद्यार्थ्याकडून हमी घेण्यात आली.
उन्हाळी सुट्टीतील कामाचे, सहलीचे, अभ्यासाचे, व्यायामाचे, सण, उत्सव, जयंती, लग्न समारंभ यांचे योग्य नियोजन करणे व यात सहभागी होणे, तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पक्षांसाठी व इतर प्राण्यांसाठी पाणी व अन्नाची व्यवस्था करणे यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. दररोज एक तास वाचनालयात जाऊन वाचन करणे व वाचनाची आवड निर्माण करणे बाबत सांगण्यात आले.
नववी पास विद्यार्थ्याकरिता आठ मार्च 2024 पासून दहावी वासंतिक वर्गाचे आयोजनही करण्यात आले यात सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर व नियमित उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात आले.
शाळेतील प्रयोगशाळा परिचर गंगाधर पापूलवार यांची मुलगी डॉक्टर प्राजक्ता पापूलवार हिने वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल पालकांचा सत्कार करण्यात आला.
शैक्षणिक वर्षात अथक परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मुख्याध्यापक सुभाष देगलूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक सुभाष देगलूरकर,शिक्षक सतीश जोशी, मारुती ढगे, हणमंत पवार, बापूराव मोरे, शंकर बालके, सुनीता मुंगडे, अनुसया स्वामी व शिक्षकेत्तर कर्मचारी गंगाधर पापूलवार राम देवगावकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सतीश जोशी यांनी केले नवउपक्रमा बद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या