मुंजाजी रेणगडे सेट परीक्षा उत्तीर्ण !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
सावित्रीबाई फुले विद्यापीठाने आयोजित केलेल्या प्राध्यापक पदासाठीच्या राज्य पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे,या परीक्षेमध्ये नगरपालिका कर्मचारी मुंजाजी रेणगडे यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या प्राध्यापक पदासाठीच्या 37 वी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा दिनांक 26 सप्टेंबर 2019 रोजी घेण्यात आले होते. सदर परीक्षेचा निकाल दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यात नगरपालिका कर्मचारी मुंजाजी रेंणगडे यांनी इंग्रजी विषयात यश संपादन केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नगराध्यक्षा सौ सुरेखा जिठ्ठावार, उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, सुभाष नीरावार, विश्वास लटपटे, प्रतीक माळवदे, वीरसेन शिरसाठ, बालाजी टोपाजी, राजेश स्वामी, गंगाधर पत्की, प्रकाश भोरे, हेमचंद्र वाघमारे, ओमकार सहाने, शंकर जायेवार, मारोती करपे, अंजनकुमार गट्टूवार, जनार्दन भोरे, मोहन कंपाळे, धोंडीबा वाघमारे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरपालिका कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या