रातोळी सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमनपदी अंकुश पाटील यांची बिनविरोध निवड !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील रातोळी येथेसेवा सहकारी संस्था, मर्या रातोळी ता. नायगाव (खै.) जि.नांदेड. सन 2023-2028 च्या कालावधीसाठी बिनविरोध चेअरमन म्हणून श्री अंकुश चंद्रभान पाटील यांची निवड करण्यात आली आहे.तसेच संचालक म्हणून पाटील शिवाजी विश्वाभर,पाटील सोमनाथ दिगांबर, मोरे शंकर गोविंद, पाटील बालाजी मारोती, टाकळे व्यंकटी माणिका, सोनकांबळे यशवंत कोंडीबा, पाटील माधुरी संदीप,लुंगारे गंगाबाई धोंडीबा,पाटील विनायक आत्माराम,पाटील गजानन निवृत्ती,पाटील दिलीप विश्वाभर यांची निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एम. ए.अली साहेब व संस्थेचे सचिव शुभाष पा.भाकरे यांच्या उपस्थितीत नेमणूक करून पूर्ण पदभार देण्यात आला आहे.यावेळी गावातील प्रमुख मान्यवर श्री शिवराज हाणमंतराव पाटील (माजी पंचायत समिती सदस्य), शिवराज व्यंकटराव मालीपाटील, विश्वंभर लक्ष्मणराव पाटील(माजी सरपंच),गोविंद लक्ष्मणराव पाटील (तंटामुक्ती अध्यक्ष) मल्लिकार्जुन आप्पा स्वामी(माजी सैनिक), डॉक्टर चिद्रे साहेब, श्री सूर्याजी पा.रातोळीकर व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत चेअरमन व संचालकाचे सत्कार करून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यावेळी श्री अंकुश चंद्रभान पाटील यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून चेअरमन पदाचा पदभार स्वीकारला व तसेच निवडणूक निर्णय अधिकारी व सचिव आणि गावातील सर्व उपस्थित मान्यवर व समस्त गावकऱ्यांचे श्री अंकुश चंद्रभान पाटील चेअरमन यांनी आभार व्यक्त केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या