अख्या तालुक्याच लक्ष लागून असलेल्या तालुक्यातील पाचपिंपळी सेवासहकारी सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून या निवणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीचे बारा पैकी बारा उमेदवार विजयी झाले आहेत.विजयी झालेल्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी आवळ्याची मोट बांधून निघालेल्या भाजपाचा मात्र पूर्णपणे फज्जा उडाल्याने म्होरक्याची मात्र गोची झाल्याचे दिसून येते.
प्रामुख्याने या गावचे रहिवासी प्रा.शिवाजी पाटील पाचपिंपळीकर हे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष असल्याने व ही निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या गेल्यामुळे या निवडणुकीकडे अख्या तालुक्याचे लक्ष लागून होते.यामुळे कुठल्याही परिस्थितीत वाढत असलेले काँग्रेसचे वर्चस्व अर्थात शिवाजी पाटील यांच्याच गावातील निवडणुकीत पाटील यांच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी भाजपाच्या एका वजनदार लोकप्रतिनिधी सोबत आजी माजी लोकप्रतिनिधी सदर सोसायटी निवडणुकीत वाटेल ते प्रयत्न करूनही त्यांच्या हाती मात्र भोपळा लागला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पँनलचे विजयी उमेदवार या प्रमाणे गोणारे हाणमंत, श्रीराम पाटील, रामपुरे विलास, गोविंद मुकदम वसंतराव दिगांबर रामपुरकर व्यंकटराव भाऊराव रामपूरे पंडितराव व्यंकटराव, रामपूरे प्रल्हाद बाबाराव, रामपूरे मोहण गोपाळ, लुटे गोविंदराव आनंद जाधव गंगाबाई नागोराव सुर्यवंशी सुनंदाबाई कमळेकर किशन शंकरराव जाधव पिराजी मोगलाजी हे असून पराभूत उमेदरावामध्ये प्रामुख्याने पॅनल प्रमुख संदिप पाटील रामपूरे बळवंत लुटे यांचा समावेश आहे.
विजयी उमेदवार व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजीराव पाटील, सरपंच कमलकिशोर पाटील यांचे अभिनंदन खासदार रवींद्र पाटील, जि.प.चे माजी सभापती संजय अप्पा बेळगे यांच्यासह काँग्रेस कडून होत आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy