जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरळी येथे सातवी शिक्षण परिषद संपन्न !!

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथून पाच किमी अंतरावर मौजे आरळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक येथे सातवे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाले .या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. शिवनंदा अशोक स्वामी या होत्या.
तर प्रमुख अतिथी म्हणून माजी पंचायत समिती सदस्य कोंडीबा मेहत्रे, सरपंच प्रतिनिधी सदाशिव बोडके ,केंद्रप्रमुख तथा प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी वाय.एस. कौटकर, हुनगुंदा केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामपुरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माचनुर चे मुख्याध्यापक रमेश करोड ,जि .प .हा. कुंडलवाडी चे मुख्याध्यापक शेट्टीवार, जि. प. के. प्रा .कन्या शाळा चे मुख्याध्यापक नारायण वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे जि. प. प्रा .शा .आरळी या शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक प्रभुनाथ देशमुख यांनी स्वागत केले. व यानंतर प्रत्यक्षपणे शिक्षण परिषदेला सुरुवात करण्यात आले. सर्वप्रथम केंद्रप्रमुख वाय.एस. कौटकर यांनी उपस्थित सर्व जि.प. व खाजगी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना प्रशासकीय सूचना व महत्त्वाचे टप्पे सांगितले .त्यानंतर सुलभक सौ.भाग्यश्री गोस्के, सौ. कल्पना सुरकुटलावार ,सौ.निता दमकोंडवार (दरबस्तेवार), सौ.गंगासागर लाकडे ,बालाजी झंपलकर ,चिलकेवार सर या सर्वांनी निपुण भारत सर्वेक्षण संबंधित भाषा, गणित ,इंग्रजी, परिसर अभ्यास आदी विषयावर सखोल असे मार्गदर्शन उपस्थित शिक्षकांना केले.
या शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन बी. डी .गट्टूवार यांनी केले .तर उपस्थितांचे आभार केंद्रप्रमुख वाय. एस. कौटकर यांनी मांनले. सदरील शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी जि. प. प्रा. शा. आरळी चे मुख्याध्यापक प्रभुनाथ देशमुख ,बी.डी. गट्टूवार,सौ. कीर्ती पायरे, शिंदे सर यांनी विशेष प्रयत्न केले.शेवटी सुरूची भोजनाने शिक्षण परिषदेची सांगता झाली.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या