सातव्या वेतन आयोगातील तिसरा व चौथ्या संदर्भात अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे. सातव्या वेतन आयोगातील तिसरा व चौथा हप्ता मिळावा यासाठी अनेक वेळा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याशी अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून व लेखी निवेदनाद्वारे हप्ता मिळण्यासंदर्भामध्ये विनंती केली होती.
परंतु सदरील हप्ते हे लवकर मिळाले नसल्याकारणाने पंचायत समिती नायगाव चे सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षण सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोक गंगाधरराव पवळे व श्री देशमुख जी पी या दोघांच्या थकीत हप्त्यासाठी अशोक पवळे सर यांनी 9 डिसेंबर रोजी आमरण उपोषणा संदर्भामध्ये लेखी निवेदन दिलेले होते. नऊ डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत कुठलीही त्यावर कारवाई झाली नसल्याकारणाने त्यांनी 15 जानेवारी 2025 रोजी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. व सर्व संबंधित अधिकारी यांना निवेदने दिली त्या अनुषंगाने त्यांनी 15 जानेवारी रोजी उपोषणाला सुरुवात केली या उपोषणाच्या समर्थनार्थ सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हा सचिव चंद्रकांत जटाळ,कार्याध्यक्ष मिराखान संघटक टेंभुर्णीकर तसेच माधवराव शिंदे, बेळगे सर, गंगाधर मावले, दिगंबर कोरे, प्रल्हाद कदम, शिंदे जी एम, भेलोंडे पांडुरंग, राजू पाटील बावणे, मंगेश हनवटे, सुरेश बाराळे, जाधव डी टी, जाधव व्ही सी, भोंगाजे सर ,गायकवाड ए डी, उत्तम वडजे, मोरगुलवार, काशेटवार, रत्नाकर कोटूरवार, देशमुख जी पी, इत्यादी यांनी पाठिंबा दर्शविला होता. नांदेड चे खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद नांदेड चे शिक्षण सभापती संजय आप्पा बेळगे व श्रीनिवास पाटील चव्हाण श्रीधर पाटील चव्हाण यांच्या मध्यस्थीने अधिकारी आणि पवळे सर यांच्यासोबत चर्चा करून पंचायत समिती नायगाव च्या वतीने एका महिन्याच्या आत सदरील थकीत वेतन अदा करण्यासंदर्भात लेखी पत्र दिल्यामुळे श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या हस्ते उपोषणाची सांगता करण्यात आली.यावेळी गटविकास अधिकारी वाजे साहेब गटशिक्षणाधिकारी संग्राम कांबळे साहेब आस्थापना प्रमुख श्री नलबलवार त्याचबरोबर दाभडकर सर यांची उपस्थिती होती.तसेच तहसीलदार डॉ गायकवाड मॅडम यांनी उपोषण स्थळी भेट दिली होती.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy