आर्य वैश्य समाजातील गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप !

 [ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात गोरगरीब गरजू महिलांना मदतीचा हात म्हणून शिलाई मशीन व पिठाची गिरणी वाटपाचा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत असून त्या दृष्टीने नायगाव शहरातील गरजवंत महिलांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिलाई मशीनची वाटप करण्यात आले आहे.
   महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने महासभेचे अध्यक्ष नंदकुमारजी गादेवार, महासचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष सुभाषराव कन्नावार, राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार,राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विजय कुंचनवार, यांच्या सहप्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात गोरगरीब गरजू महिलांना मदतीचा हात म्हणून शिलाई मशीन व पिठाची गिरणीच्या वाटप उपक्रम राबविण्यात येत असून त्यादृष्टीने नायगाव शहरातील गरीब महिलांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप करण्यात आली राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्य महासभेच्या वतीने सामाजिक उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून त्या दृष्टीने नायगाव शहरातील गरजवंत व गरजू महिला व ग भा गंगामनी पंढरीनाथ कत्तुरवार, ग भा सुनंदा विठ्ठल मोरलावार, यांना मदतीचा हात देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
यावेळी सहसचिव सदानंद मेडेवार, महासभेचे राज्य कार्यकारिणी सदस्य साईनाथ मेडेवार, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख गजानन चौधरी, विभागीय जनगणना प्रमुख पवन गादेवार, जिल्हा कार्यकारणी सदस्य धनंजय कवटीकवार ,साईनाथ वट्टमवार, नायगाव आर्य वैश्य समाज बांधव अध्यक्ष सतीश मेडेवार, सतीश लोकमानवार, वसंत जवादवार, दशरथ बच्चेवार, अतुल कवटीकवार,ओमप्रकाश नारलावार, महेश पतेवार, प्रदीप देमेवार, मनोज अरगुलवार, संगमशेठ गंदेवार, सचिन कवटीकवार, मारोती कतुरवार, उल्हास गबाळे, आदीसह प्रमुख आर्य वैश्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या