शेषाबाई गोविंदराव पाटील चव्‍हाण यांचे निधन !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथून जवळ असलेल्या चिरली येथील ज्येष्ठ महिला शेषाबाई गोविंदराव चव्‍हाण ( वय ७८) यांचे दिनांक ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता निधन झाले. त्यांच्यावर दिनांक ३१ डिसेबर शुक्रवार रोजी दुपारी २ वाजता चिरली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा ,सून, नातू,नातसुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या चिरली येथील माजी सरपंच तानाजी गोविंदराव पाटील चव्हाण यांच्या त्या आई होत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या