शेख युनूस यांना उत्कृष्ट महसूल सहाय्यक पुरस्कार!

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नांदेड जिल्ह्यातील किनवट त्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ असलेल्या सहस्त्र कुंड धबधबा येथे संपन्न झालेल्या महसूल दिनानिमित्ताने बिलोली विभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून राजेश अलमवाड बरबडेकर यांना कर्तव्यदक्ष अवलकारकून म्हणून तर नायगाव तहसील कार्यालयातील शेख युनूस नायगाव यांना उत्कृष्ट अव्वल कारकून म्हणून जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या सह सहाय्यक जिल्हाधिकारी सोम्या शर्मा यांनी शाल श्रीफळ प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजारा, उपविभागीय अधिकारी सचिन गिरी , नायगाव तहसीलदार गजानन शिंदे, महसूल विभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते राजेश आलमवाड व शेख युनूस यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या