शंकर भंडारे यांचा थडीसावळी ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
               बिलोली तालुक्यातील थडीसावळी गावचे रहिवासी सध्या नांदेड येथील गांधीनगर मध्ये वास्तव्यास असलेले तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत निवृत्त केंद्रप्रमुख शंकर भंडारे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन थडीसावळी ग्रामपंचायतीच्या वतीने शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 
               सन १९७५ पासून शंकर भंडारे समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान, व्यसनाधीनता, बेरोजगारी, बालकामगार अशा आदी समस्यांच्या निर्मूलनासाठी प्रबोधनाचे काम करीत आहेत. राष्ट्रीय नेत्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या तसेच सामाजिक स्तरावरील मेळावे व मार्गदर्शन शिबिरातून त्यांनी सामाजिक व राष्ट्रीय मूल्यांची रुजवणूक होण्याकरिता जनजागृतीचे काम करीत असतात. 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शंकर भंडारे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून थडीसावळी ग्रामपंचायतीचे सरपंच शिवचंदन आनपलवार ग्रामपंचायतीचे सदस्य शिवात्मा भंडारे,ग्रामसेविका सौ. एल. बिरादार,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयरामजी भंडारे, अशोक मुद्दिराज,रविंद्रसिंह चव्हाण,मोहन काळे, शिवदानसिंह ठाकूर, बसुअप्पा मठपती, नरसिंग सानेबोईनवाड, शंकर सिदमलवाड, कोंडीबा डुबुकवाड, व्यंकट चमकुलवार, लक्ष्मण सानेबोईनवाड, रामु सानेबोईनवाड,आनंदा येडलेवार,शिवाजी येडलेवार,गौतम काळे, बाबू अनपलवार आदींसह गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते..
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या