बिलोली तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात सापडल्याने सक्तीची विज बिल व महसुली कर वसुली थांबवा शंकर महाजन यांची मागणी

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
बिलोली तालुक्याती शेतकरी अतिवृष्टी मुळे हतबल झाले आहेत.त्यातच शासना कडुन आर्थिक अनुदान हि अंत्यत तुटपुंज्या स्वरुपात देण्यात आले. विमा कंपनीने तर विमा मंजुर करुन विमा परताव करताना शेतकर्‍याची एक प्रकारची चेष्टाच केली आहे.

हे सर्व शेतकरी बांधव सहन करत असताना मधेच सक्तीने विज बिल वसुली व महसुली कर वसुली चालु केल्यामुळे शेतकरी पुर्णत: हातबल झाले आहेत. शासन एका हताने तटपूंजी मदत देते तर दुसर्‍या हाताने दाम दुप्पट ( विज बिल व महसुली कर च्या माध्यमातुन) शेतकरी बांधवान कडुन काढुन घेते. या शासकीय धोरणामुळे शेतकर्‍यां समोर आत्महत्ये शिवाय पर्याय उरलेला नाही.
असे निवेदन ईमेल द्वारे वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंञी,  विभागीय आयुक्त,औरगाबाद, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक, बिलोली याना दिले तसेच यामुळे सक्तीचे विज बिल वसुली व महसुली कर वसुली त्वरीत थांबवावे असा ईशारा दिला आहे.
सक्तीची वसुली न थांबवल्यास पुढील काळात शेतकर्‍यांना सोबत घेउन वंचित बहुजन आघांडी हातात लाठ्या काट्या घेउन सक्तीचे वसुली करणार्‍या व विज कनेक्शन कट करनार्‍या आधिकार्‍यांना उत्तर देण्यात येईल. यात कायदा व सुवेवस्था प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी आपन व आपले प्रशासन जबाबदार राहील असा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यांनी दिला आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या