नरसीत मराठवाड्याचे भगीरथ श्रद्धेय डाॅ.शंकररावजी चव्हाण साहेब यांची जयंती उत्साहात साजरी. 

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
मराठवाड्याचे भगीरथ जलप्रनेते श्रद्धेय डाॅ. शंकररावजी चव्हाण साहेब यांची १०३ वी जयंती ग्रा. पं. कार्यालयात नरसी व समस्त गावकरी यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी प्रथम डाॅ.शंकररावजी चव्हाण साहेबांच्या प्रतीमेचे विधीवत पुजन करून अभिवादन करण्यात आले.
डाॅ.शंकररावजी चव्हाण साहेब यांचा स्वातंत्र्य महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे व वीज विभागाची जबाबदारी देण्यात आली त्यांनी पाटबंधारे मंत्री म्हणून केलेल्या अलौकिक काम त्यांच्यतील असामान्यत्वाची प्रचीती देते त्यांच्या कार्यकाळात गंगापूर, वीर धरण, खडकवासला, वारणा, गिरणा, घोड, कृष्णा, पूर्णा, मुळा, अप्पर दुधना, भीमा, जायकवाडी, इसापूर, मुळसी, दुधगंगा-वेदगंगा, अप्पर वर्धा, अप्पर पैनगंगा, सौखी, पेच, अप्पर तापी, अप्पर गोदावरी, उजनी, वरसमाव, चाकसमान, हातनूर, मनार आदी मोठे, मध्यम व इतर शेकडो प्रकल्प हाती घेण्यात आले आज महाराष्ट्रात जे १८ टक्के सिंचन आहे त्यातील ८० टक्के सिंचन केवळ नि केवळ डाॅ. शंकरराव चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नातून झाले आहे हे आपणास विसरता येणार नाही म्हणून त्यांना जलक्रांतीचे जनक देखील म्हनतात.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, नायगाव शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र पाटील भिलवंडे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजू गंदिगूडे, सरपंच गजानन पाटील भिलवंडे, ग्रामविकास अधिकार नागेश यरसनवार, सेवादलाचे तालुका अध्यक्ष मधुकर पाटील ताटे, वसीम बेग पो.पाटील, संजय महाराज जोशी, जेष्ठ पत्रकार गंगाधरराव भिलवंडे, मा.सरपंच एन.डी.नरसीकर, ग्रा.प.सदस्य रफीक शेख, पपन गायकवाड, मा.उपसरपंच नजीरशेठ बागवान, मा.ग्रा. प.सदस्य नजीर शेख, लालबा सुर्यवंशी, देवीदास सुर्यवंशी, शहराध्यक्ष जब्बार खान, सुभाष चुट्टेवाड, अनिल बोधने, रमाकांत सुर्यवंशी, विश्वनाथ तळणे, दत्ता गागलेगावे, दिलीप सुर्यवंशी, बालाजी नागेश्वर यांच्यासह अनेक मान्यवर व गावकरी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या